Proper Trick :- Online Study Become Easy

Its All Related To Online Study Material, Question, Exam Preparation And Online Learning Of English Grammer For The Student Who Loves To Study With Their Mobile And Laptop by dilmeniya

Follow by Email

Tuesday, 15 September 2020

वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)

  Propertrick       Tuesday, 15 September 2020

वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)

वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. आता वाढत्या वयाबरोबर त्याचं अप्रूप कमी होत जातं. ती गोष्ट वेगळी आहे. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही तिचं भाग्य घेऊन पृथ्वीतलावर येत असते. त्यामुळे मिळालेले आयुष्य हे प्रत्येकाने समाधानाने जगणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्या वाढदिवसाला कमी लेखू नये. हा दिवस आहे जल्लोषाचा आणि धन्यवाद देण्याचा. मग ते आपल्या घराच्यांबरोबर सेलिब्रेशन करणं असो वा त्या दिवशी एखादं चांगलं समाजकार्य करणं असो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
आईबाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ताईला छोट्या बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणींकडून वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
पत्नीकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वहिनीसाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा
बेस्ट फ्रेंडसाठी बर्थडे विशेस
गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरासाठी
वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा
50 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा
वाढदिवसासाठी खास स्टेट्स
वाढदिवसाच्या शुभेच्छा पण उशिराने

वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Birthday Messages In Marathi)


%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-Birthday Messages-In Marathi

वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. या दिवशी नक्की शुभेच्छा द्या तुमच्या जवळच्यांना. 

1) या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी...आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

2) जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

3) झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

4) सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

5) नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

6) आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

7) !! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

8) जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

9) काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
logoblog

Thanks for reading वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)

Previous
« Prev Post

No comments:

Post a comment